समता सैनिक दलाच्या शताब्दी वर्षाचा दिमाखदार प्रारंभ;
ऐतिहासिक नगरीत 'समता सैनिक दल' बोर्डचे भव्य उद्घाटन!
महाड : क्रांतीची भूमी असलेल्या महाडमध्ये आज एक ऐतिहासिक सोहळा संपन्न झाला. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ रोजी चवदार तळ्याचा संग्राम केला, तत्पूर्वी १९ मार्च १९२७ रोजी त्यांनी 'अखिल भारतीय समता सैनिक दला'ची (SSD) स्थापना केली होती. या दैदिप्यमान इतिहासाच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून महाड नगरीत 'अखिल भारतीय समता सैनिक दल' या संस्थेच्या अधिकृत बोर्डचे भव्य उद्घाटन अतिशय उत्साहात करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय समता सैनिक दलाचे अध्यक्ष शिवराम जाधव, समता सैनिक दलाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बुधाजी वाढविंदे, बहुजन सेना अध्यक्ष दिपेश भाई जाधव, राज्य महासचिव हेमंत जी जाधव, अ.भा. समता सैनिक दलाचे कार्याध्यक्ष अनिल बापू वाघमारे , राज्य पदाधिकारी मधुकर साळवे, मा. मुकेश कांबळे उपस्थित होते.
महाडमध्ये समता सैनिक दलाचा परिचय देणारा बोर्ड असावा, ही अनेक वर्षांची इच्छा आज पूर्ण झाली. अखिल भारतीय समता सैनिक दल, दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा) आणि बहुजन सेना यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या बोर्डवर राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजरत्न अशोकराव आंबेडकर साहेब यांचे नाव असून, त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हे कार्य तडीस नेण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात ऐतिहासिक क्रांती स्तंभ येथे करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते बोर्डचे भव्य उद्घाटन झाल्यानंतर समता सैनिक दलाच्या सैनिकांनी आणि भीम सैनिकांनी शहरातून भव्य रॅली काढली. ही रॅली चवदार तळ्यावर पोहोचल्यानंतर तिथे दुसऱ्या बोर्डचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी चवदार तळ्याच्या पाण्याला स्पर्श करून महामानवाच्या स्मृतींना अभिवादन केले आणि या संघर्षाच्या इतिहासावर प्रकाश टाकला.
रॅलीचा मार्ग केवळ चवदार तळ्यापर्यंत मर्यादित नव्हता, तर ती सुलभा टिपणीस यांच्या निवासस्थानासमोरही गेली. तिथे त्यांना मानवंदना देऊन त्यांच्या ऐतिहासिक योगदानाबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. रॅलीचा समारोप क्रांती स्तंभा जवळ असलेल्या त्यागमूर्ती माता रमाई भव्य विहारापाशी झाला.
विहारामध्ये सर्व उपस्थितांचा सन्मान करण्यात आला आणि आभार प्रदर्शन करून 'तिसरण-पंचशील' (शरणं त्रय) घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. शताब्दी वर्षाच्या निमित्ताने महाड नगरीत समता सैनिक दलाचा हा बोर्ड लागल्याने आंबेडकरी अनुयायांमध्ये आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण आहे. या सोहळ्याला राज्यभरातून प्रमुख पदाधिकारी यांच्यासह मोठ्या संख्येने समता सैनिक आणि भीम सैनिक उपस्थित होते.
#Mahad #SamtaSainikDal #SSDCentenary #ChavdarTale #DrRajratnaAmbedkar #AmbedkariMovement #NagpurNewsPortal
Grand Commencement of the Samata Sainik Dal's Centenary Year; Majestic Unveiling of the 'Samata Sainik Dal' Board in the Historic City!
Mahad: A historic ceremony took place today in Mahad, a land steeped in revolutionary history. On March 20, 1927, the Great Luminary Dr. Babasaheb Ambedkar led the historic 'Chavdar Tale' (Chavdar Tank) struggle; prior to this, on March 19, 1927, he had established the 'All India Samata Sainik Dal' (SSD). Marking the occasion of the centenary year of this illustrious history, the official board of the 'All India Samata Sainik Dal' organization was unveiled with great enthusiasm in the city of Mahad.
Present at the event were Shivram Jadhav (President, All India Samata Sainik Dal), Budhaji Wadhvinde (Maharashtra State President, Samata Sainik Dal), Dipesh Bhai Jadhav (President, Bahujan Sena), Hemant G. Jadhav (State General Secretary), Anil Bapu Waghmare (Working President, All India Samata Sainik Dal), and state office-bearers Madhukar Salve and Hon. Mukesh Kamble.
A long-cherished desire—that there should be a board in Mahad introducing the Samata Sainik Dal—was finally fulfilled today. This program was organized through the joint efforts of the All India Samata Sainik Dal, The Buddhist Society of India (Bharatiya Bauddha Mahasabha), and the Bahujan Sena. The board bears the name of the National President, Dr. Rajratna Ashokrao Ambedkar, and this initiative was brought to fruition under his direct guidance. The program commenced at the historic 'Kranti Stambh' (Pillar of Revolution). Following the grand unveiling of the board by the dignitaries, soldiers of the Samata Sainik Dal and 'Bhim Sainiks' (followers of Dr. Ambedkar) took out a magnificent rally through the city. Upon reaching the Chavdar Tank, a second board was unveiled at that historic site. On this occasion, the dignitaries present paid homage to the memory of the Great Leader by touching the waters of Chavdar Tale (Chavdar Lake) and shed light on the history of this struggle.
The route of the rally was not limited solely to Chavdar Tale; it also passed in front of the residence of Sulabha Tipnis. There, a tribute was paid to her, and her historic contributions were highlighted. The rally concluded at the grand 'Tyagamurti Mata Ramai Vihara,' situated near the Kranti Stambh (Revolution Pillar).
Inside the Vihara, all those present were felicitated; the program concluded with a vote of thanks and the recitation of the 'Tisaran-Panchasheel' (The Three Refuges and Five Precepts). On the occasion of the centenary year, the installation of the Samta Sainik Dal's signboard in the city of Mahad has created an atmosphere of joy and pride among Ambedkarite followers. This ceremony was attended by a large number of Samta Sainiks and Bhim Sainiks, alongside key office-bearers from across the state.
#Mahad #SamtaSainikDal #SSDCentenary #ChavdarTale #DrRajratnaAmbedkar #AmbedkariMovement #NagpurNewsPortal
No comments